Blaupunkt ने भारतात CyberSound सीरिज अंतर्गत ४ नवीन स्मार्ट टीव्ही लाँच केेले असून, या स्मार्ट टीव्हींची किंमत खूपच कमी आहे. १० जुलैपासून ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वरून या टीव्हींना तुम्ही खरेदी करू शकता.
हायलाइट्स:
- Blaupunkt ने लाँच केले शानदार टीव्ही.
- या टीव्ही सीरिजमध्ये २ इंच ते ५५ इंचपर्यंतचा समावेश.
- टीव्हीची किंमत १४,९९९ रुपयांपासून सुरू.
नवी दिल्ली : Blaupunkt ने भारतीय बाजारात CyberSound सीरिज अंतर्गत नवीन स्मार्ट टीव्ही रेंजला लाँच केले आहे. याची किंमत १४,९९९ रुपयांपासून सुरू होते. नवीन सीरिजमध्ये ४ मॉडेल्स लाँच केले असून, यात ३२ इंच ते ५५ इंचपर्यंतचा समावेश आहे. यात एचडी ते अल्ट्रा एचडी तंत्रज्ञान देण्यात आले आहे. Blaupunkt CyberSound सीरिज अँड्राइडवर काम करते. यात स्मार्ट कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. या सीरिजच्या मॉडेल्सची किंमत आणि फीचर्स जाणून घेऊया.
वाचा: itel ने भारतात लाँच केले २ स्मार्ट टीव्ही, ग्राहकांना घरात मिळणार थिएटरचा आनंद
Blaupunkt CyberSound सीरिजची किंमत आणि उपलब्धता:
या सीरिजच्या ३२ इंच एचडी स्क्रीन मॉडेलची किंमत १४,९९९ रुपये आहे. ४२ इंच फुल एचडी स्क्रीनसह येणाऱ्या मॉडेलची किंमत २१,९९९ रुपये आहे. ४३ इंच अल्ट्रा एचडीची किंमत ३०,९९९ रुपये आणि ५५ इंच अल्ट्रा एचडी स्क्रीनसह येणाऱ्या मॉडेलसाठी ४०,९९९ रुपये मोजावे लागतील. याचा सेल १० जुलैपासून ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर सुरू होईल. कंपनी यावर एक वर्षाची वॉरंटी देत आहे. ही सीरिज भारतातXiaomi, Vu, Realme, TCL आणि Samsung सारख्या कंपन्यांना टक्कर देईल.
वाचा: Google meet, Zoom ला तगडे आव्हान देणार VideoMeet हे भारतीय अॅप, शानदार फीचर लाँच
Blaupunkt CyberSound सीरिज स्मार्ट टीव्हीचे स्पेसिफिकेशन्स
याचे ३२ इंच आणि ४२ इंच मॉडेल ४० वॉट साउंड आउटपूटसोबत येतात. तर ४३ इंच ५० वॉट आणि ५५ इंच ६० वॉट साउंड आउटपूटसह येतात. या सीरिजच्या दोन्ही अल्ट्रा-एचडी व्हेरिएंटमध्ये डॉल्बी डिजिटल प्लस, डीटीएस ट्रूसराउंड आणि डॉल्बी एमएस १२ टेक्नोलॉजीचा सपोर्ट मिळेल. साउंट व्यतिरिक्त हे व्हेरिएंट एचडीआर कॉन्टेंट देखील सपोर्ट करतील. यात एचडीआर१०+ फॉर्मेटपर्यंत कॉन्टेंट पाहू शकता.
या सीरिजमधील चारही व्हेरिएंट अँड्राइडवर काम करतात. यात गुगल प्ले स्टोरवर अॅप्स आणि कॉन्टेंटचा अॅक्सेस मिळेल. सोबतच, गुगल क्रोमकास्ट आणि गुगल असिस्टेंटचा सपोर्ट मिळेल. प्रत्येक व्हेरिएंटमध्ये रॅम आणि स्टोरेज वेगवेगळे आहे. ५५ इंच स्क्रीन व्हेरिएंट २ जीबी रॅम आणि ८ जीबी स्टोरेजसह येतो. यात क्वाड-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे.